होय मी मुद्रक


होय मी मुद्रक
 मी माझ्या कामाचे मूल्य ठरवू शकत नाही, कस्टमरने माझा बराच वेळ खाल्ला तरी कस्टमर जाईल या भीतीने त्याला वेळच वेळ देतो. कस्टमरला आपल्या शेजारी बसवून हवेत असे फॉन्ट हवी तशी रंग संगती अगदी चुटकीसरशी बदलून मी किती अफलातून आहे किंवा किती पटकन आपले डिझाईन करतो याची चांगली छाप कस्टमर च्या मनावर बिंबविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो.
 सर्व काही ही छान, सुंदर, सुबक आणि कस्टमरच्या मनासारखे झाल्यानंतर माझ्या कामाचे मूल्यांकन मला करता येत नाही किंवा कस्टमरद्वारे केले जाते. वर असे ऐकावे लागते अरे हे करायला तुला फार वेळ नाही लागला, तू अगदी चुटकीसरशी केलेस. मग यासाठी तुला आम्ही इतकेच पैसे देऊ. मग काय आपण गप्प राहून कस्टमर देईल तेवढेच पैसे घ्यायचे. 
कधी आपल्याला विचार येत नाही का हो ?
आपण भली मोठी इन्व्हेस्टमेंट करून अद्ययावत कम्प्युटर तसेच प्रिंटर विविध लिगल सॉफ्टवेअर खरेदी करत राहतो, आणि बऱ्याच वर्षांचा डेटा आपण स्टोअर करतो. याला काही पैसे पडत नाहीत का हो ? आणि 
आपण डिझाईन शिकणेसा्ठी आयुष्यभर केलेली माती याचे मुल्य ठरविता येत नाही का हो?
 जर आपल्याला आपल्या कामाचे दर ठरविता येत नसेल तर आपण कामकाज बंद केलेले बरे, कारण आणि किती दिवस लाचार होणार? मित्रहो कस्टमर आज आहे उद्या नाही, एखादे कस्टमर गेले तर बेहत्तर पण मी माझ्या कामाचा दर बिलकूल कमी करणार नाही. हे प्रत्येकाने मनोमनी ठरविले पाहिजे. जर कस्टमर एखाद्याचे नांव सांगून दर कमी करून मागत असेल तर त्याच्या समोरच समोरच्या प्रेस/डिझाईनरला फोन लावा आणि शहानिशा करा. यामुळे तुमच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होत जाईल.
 आजची परस्थिती फार बिकट आहे कारण आप-आपसातल्या स्पर्धा, स्मार्ट फोन व टेक्नॉलॉजी, त्यरतील विविध डिझाईचे सॉफ्टवेअर्स त्यामुळे आपला धंदा कमी होत चालला आह, हे आपण जाणतोच तरीदेखील प्रोफेशनलिझम कामासाठी एखादा मुद्रक/डिझाईनर प्रोफेशनलच निवडावा लागतो. वेळ गेलेली नाहीये, आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवा. आणि आपला व्यवसाय पूर्नजीवीत करा.
 
दीपक वस्त्रे (माजी अध्यक्ष)
इचलकरंजी परिसर मुद्रक संघ, इचलकरंजी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने