ग्राफिक्स डिझाईन आणि तिचा होत चाललेला खेळ..!

 

      मी अजुन या ग्राफिक्स डिझाईन च्या क्षेत्रात शून्य आहे असं मला वाटतं. मी आता कुठे सुरुवात केली तसं मी एक वर्षापासून या क्षेत्रात काम करतो. पण अजुन देखील पाहिजे तसं मला या क्षेञाबद्दल व्यवस्थित माहिती नाही. मी एक मोबाईल वर डिझाईनिग बनवतो त्याला तुम्ही प्रोफेशनल नाही म्हणणार.



       मला आज खुप काही लिहावस वाटलं या सर्व गोष्टी वर ग्राफिक्स बद्दल एका ग्राफिक्स डिझाईनर बद्दल त्यांच्या भावनेबद्दल या क्षेत्रात त्यांची कमी होत चालेल कमीत तिला आपण ‌लोप पावणे असं पण म्हणू शकतो. मी काही ग्राफिक्स डिझाईनर स्व:ताला म्हणून घेणार नाही आजपर्यंत मी मोबाईल वर ग्राफिक्स बनवून मला ग्राफिक्स डिझाईनर म्हणून घेत आलो. पण आज काही तरी वेगळंच वाटलं या क्षेञाबद्दल आणि मला लिहावस वाटलं या क्षेञाला लोक आता कोणत्या दृष्टिकोनातून बघायला लागले.


     परवा मी एक पोस्ट शेअर केली होती ग्रुप वर की मला एक चांगला ग्राफिक्स डिझाईनर होण्यासाठी कोणत्या ठिकाणी उत्तम कोर्स उपलब्ध होईल. मला या क्षेञाची ओढ जेव्हा पासून मी मोबाईल वापरतो तेव्हापासून होती पण कधी कॅम्युटर घेऊन इडिटिग नाही केली. पण या ग्राफिक्स बद्दल मनात खूप काही स्वप्न बघून व यांची आवड असल्यामुळे मी या क्षेञाकडे बघायला सुरुवात केली.


     पण त्या पोस्ट नंतर मला एका व्यक्तीने मेसेज केला व सांगितलं की या ग्राफिक्स चा काही लोकांनी खेळ मांडायला .गोळ्या बिस्किट कशी विकत घेतो तसं काही आपले पोस्टर, बॅनर, कंटेंट हे पाच दहा रूपयांच्या भावाने विकतात. त्यांनी मला सांगितलं की, मी पाच वर्षं या क्षेञात चांगलं यश मिळवण्यासाठी डिग्री केली .आणि मला दहा पंधरा वर्षांचा अनुभव आहे. पण या क्षेत्रात कोणी पण येत आणि गोळ्या बिस्किट विकल्यासारख दहा वीस रूपये घेऊन ग्राफिक्स बनवून देत यात फक्त आणि फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय ज्यांनी यासाठी आपला राञ-दिवस यात दिलाय. त्यानंतर आपली ओळख निर्माण केली आणि तरी देखील यात या क्षेत्रात लोकांना जे वीस तीस रूपये देऊन ग्राफिक्स बनवून देतात त्यांच्या ग्राफिक्स आवडतात. मी त्या लोकांना अजिबात ग्राफिक्स डिझाईनर म्हणणार नाही.कारण या क्षेत्रात जो पण ‌येतो त्याची विचार करण्याची क्षमता खुप भारी असते कोणी पण उठसुठ काही केलं तर कसं जमेल .


       मला पण अजुन खुप काही शिकायचं मी अगोदरच म्हणालो की मी यामध्ये अजुन पण शून्य आहे. आणि या क्षेञाची आवड मला होती आहे आणि राहणार . फक्त दु:ख याचं गोष्टीचं वाटतंय की या अशा महान क्षेञाला काही लोकांमुळे कदाचित असा काळ येईल की कोणीच महत्व देणार नाही‌. त्यासाठी सर्वांनी काही तरी करण गरजेच आहे. तेव्हाच या क्षेत्रात आपण नावारूपाला येऊ .

जसं डॉक्टर ला लोक इजत देतात तो पैसे घेऊन त्यांचा जीव वाचवतो तरी तो त्याच्या साठी देव आहे.आणि आपण पण याचं काही लोकांच्या जाहिराती करून त्यांना मोठेपणा देतो.

बघा जर एखाद्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आहे त्यासाठी यांना ग्राफिक्स लागणारं, यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेण्यासाठी यांना ग्राफिक्स लागणारं, यांनी काही चांगलं काम केलं तर ते ‌लोकापर्यत पोहण्यासाठी पण आपलंच ग्राफिक्स काम करणार मग आपण का स्वतःचं अस्तित्व असं छोटं बनवतोय का शेंगदाण्याच्या ‌भावाने आपण आपली ग्राफिक्स लोकांना विकतोय .मी जोपर्यंत एक चांगला ग्राफिक्स डिझाईनर होत नाही तोपर्यंत मी कोणत्याच स्वरूपात यानंतर जो भाव आहे त्यापेक्षा कमी दारात कोणालाच काही विकणार नाही. यात मरमर फक्त जो खरंच मेहनतीने करतो त्यांची होत आहे. यात सर्वात मोठी चुक फक्त जे स्व:ताला ग्राफिक्स डिझाईनर म्हणून घेऊन चारण्याच्या भावाने डिझाईन विकत आहे अशांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करेन खुप गरजेचं आहे .आता मला जे मोबाईल वर बनवतात ते माझ्यावर रागवतील मी पण सुरूवात तिथूनच केली आहे अजुन मला फोटोशॉप कसं चालवतात हे सुध्दा माहीत नाही फक्त येवढच सांगेल तुमच्यात कला आहे ना मग त्या कलेचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करा पण कोणालाच असं कमी किंमतीत कधीच ग्राफिक्स विकू नका. तुम्ही मोबाईल वापरा की पीसी ते तुमचं तुम्ही ठरवा पण जी कमीत योग्य आहे त्याचं कमीत विका .

यामुळे या क्षेत्राला कोणी कमी समजणार नाही आणि यात कमी असं काहीच नाही असं मला वाटतं.

मी अजुन या क्षेत्रात लहान आहे.

पण मला खुप अनुभव आले त्यावर मी बोलो.

अनिकेत कुहीरे

Beyond sky of thoughts🤗

2 टिप्पण्या

  1. कृपया 'ञ' घ्या ठिकाणी 'त्र' लिहावे.
    संदर्भ: https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9E

    उत्तर द्याहटवा
  2. मित्रा तू
    बरोबर बोला काही नाहीतर आता 70% लोक शेंगदाण्याच्या भावात आपली डिजाईन देतात........ पण याच कारण काय आहे हे पण मी तुम्हला सांगतो..... एकवेळ राग येईल तुम्हला परंतु येउद्या काही हरकत नाही...............!

    काय झालं आहे कि आपल्याच ग्राफिक्स च्या क्षेत्रात toper डिग्री करून असलेले काही लोक ते स्वतः चा शॉप टाकून............. बसलेले नाहीयेत तर ते ग्राफिक्स च्या क्षेत्रात काय शिकले डिजाईन कश्या बनव्याच्या हेच talent ही लोक चार पैश्यासाठी youtube वर वीडियो बनवून डिजाईन कशी बनवायची त्याच मटेरियल png background वैगरे हे सगळं फ्री मध्ये देतात.... परंतु मान्य आहे मला तुम्हला youtube च्या माध्यमातून चार पैसे मिळतात.......... पण तुमच्यामुळे आज 5 वी मध्ये शिकत असलेला एक छोटा मुलगा सुधा तुमचे वीडिओ बघून तो same डिजाईन बनून तो हळूहळू आपल्या पेक्षा भारी डिजाईन बनवतो.........


    तर तो तर काय कसली फीस वैगरे भरून तो काही शिकलेला नाही तर.... त्यामुळं त्याला काही फरक पडत नाही कि तो त्याची डिजाईन ₹20-₹30 देऊ याचा त्याला अजिबात फरक पडत..... नाही...


    आणि जो कुणी अगोदर पैसे भरून शिकतो
    त्याला त्या भरलेल्या पैशाची किमत असते आणि या क्षेत्रात ज्याला खरच घडायचं आहे ना तो पैसे देऊनच शिकतो............




    हे youtube वर बघून जे काही लोक स्वतः ला ग्राफिक्स डिजाईनर म्हणतात.. . तर यासारख्या लोकांमुळे....... या क्षेत्रात लोकांची प्रगती होत..........
    तूम्ही या youtube वर काही पैस्यासाठी subcriber.... साठी तुमचं talent असं मोफत देतात.... तर तुम्ही स्वतः बदला स्वतःचे ग्राफिक चा class open करा तिथे फीस ठेवा........... तिथून पैसे कमवा........



    तरच या क्षेत्रात आपली किंमत राहील आणि यात तीच लोक पाऊल टाकतील त्यांना खरच आयुष्यात.......... त्यांचं स्वप्न पूर्ण करायच आहे..... तेच येतील बाकीचे फुकटात दिल्लीचे बॅनर करणारे...


    Time pass करणारे नाही यायचे.....

    तुम्ही स्वतः बदला............. बाकी दुनिया बदलेल... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻





    कोणत्याही youtuber च्या भावना दुखवायच्या नव्हत्या..... मला....,




    पण यागोष्टी वर थोडा विचार करून बघा............... 🙏🏻🙏🏻🙏🏻



    आणि हो मी काही खूप मोठा DESIGNER नाही ये..... मला माझे विचार मांडायचे होते म्हणून मी मांडलेत............. 🙏🏻

    माझी सध्याची परिस्थिती नाहीये CLASS लावण्याची.... PC वैगरे घेण्याची... आणि मी या क्षेत्रात येण्यासाठी खूप कष्ट करतोय...... एक दिवस..... होईल पूर्ण..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


    धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील
    🙏🏻



    मी तुझा मित्रच समज
    ज्ञानेश्वर कोरडे
    DNYANESH GRAPHICS
    ज्ञानेश्वर कोरडे
    DNYANESH GRAPHICS

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने